Breaking : गोळीबार करणाऱ्या दोघांना धुळ्यातून अटक

गुन्हे जळगाव ठळक बातम्या

जळगाव (CrimeToday.news) । जुन्या वादातून तरूणावर गोळीबार करून फार झालेल्या दोन जणांना एमआयडीसी पोलीसांनी धुळ्यातील देवपूर येथील नातेवाईकांच्या घरातून अटक केली आहे. दिक्षांत उर्फ दादू देविदास सपकाळे (वय २०, रा. लक्ष्मीनगर, मेहरुण) व गोपाल सिताराम चौधरी (वय २१, रा. रामेश्र्वर कॉलनी) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

सोहम गोपाल ठाकरे वय १८ रा. मेहरूण हा तरूण आपल्या परिवारासह राहतो. त्याच परिसरात राहणारा दिक्षांत उर्फ दादू सपकाळे याच्यासोबत वाद झाले होते. त्यांच्यातील वाद मिटल्यानंतर देखील दिक्षांत हा सोहमला नेहमी खून्नस देवून पाहत होता. शुक्रवार १ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता सोहम हा त्याचे मित्रांसोबत मेहरूण येथील श्रीराम कन्या शाळेजवळ बोलत उभा होता. यावेळी दोन दुचाकीवर चार जण त्याठिकाणी आले. त्यातील एका दुचाकीवर दिक्षांत सपकाळे, गोपाल चौधरी तर दुसऱ्या दुचाकीवर दोन अनोळखी इसम होते. चौघांनी सोहमला शिवीगाळ केली. याचा जाब विचारताच दिक्षांतने पुन्हा शिवीगाळ करत तु माझ्या बहिणीचा नाद सोडला नाही, थांब तुझा मुडदा पाडतो असे म्हणत सोहमवर गोळीबार केला आणि चौघे दुचाकीवरून पसार झाले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. हल्लखोर पसार झाल्याने दोन पथके त्यांच्या शोधार्थ रवाना केले होते. दरम्यान गोपनीय माहितीनुसार हल्लेखार संशयित दिक्षांत उर्फ दादू सपकाळे हा साथीदारांसह धुळे येथील देवपुर येथे नातेवाईकांकडे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने शनिवारी २ मार्च रोजी सकाळी १० वाजता संशयित दिक्षांत उर्फ दादू देविदास सपकाळे (वय २०, रा. लक्ष्मीनगर, मेहरुण) व गोपाल सिताराम चौधरी (वय २१, रा. रामेश्र्वर कॉलनी) या दोघांना अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, पोहेकॉ किरण पाटील, सचिन मुंढे, किशोर पाटील, छगन तायडे, गणेश शिरसाळे, ललित नारखेडे यांच्या पथकाने केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *