बालमजूरांना कामावर ठेवणे भोवले; दोन ॲटो गॅरेजधारकांवर गुन्हा दाखल

गुन्हे चाळीसगाव

चाळीसगाव (Crime today news) | शहरातील घाट रोडवरील २ ऑटो गॅरेजच्या ठिकाणी काही बालमजुरांना कामावर ठेवून कमी पैसे देवून जास्त काम करून घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लचाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात बालमजूर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव शहरातील घाट रोडवर असलेल्या पंचम आटो गॅरेज आणि एस.के. ऑटो गॅरेज या दोन दुकानावर काही किशोरवयीन अल्पवयीन मुलांना कामावर नियुक्त करून त्यांचे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण केले जात असल्याची माहिती चाळीसगाव शहर पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी कारवाई केली. यामध्ये लहान मुलांकडून जास्त काम करून घेत त्यांना कमी वेतन देऊन क्रुरपणाची वागणूक दिल्याचा प्रकार निदर्शनास आला. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गॅरेज धारक शेख आशिक शेख युनूस (वय-३० रा. हुडको कॉलनी, चाळीसगाव) आणि हासिम शेख नासीर शेख (वय-२७ रा. हुडको कॉलनी चाळीसगाव) या दोघांविरोधात बालमजूर कायद्याअंतर्गत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास स.फौ. सुभाष पाटील हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *