संशयास्पदरीत्या फिरणारे दोघे ताब्यात; एमआयडीसी पोलीसांची कारवाई

गुन्हे जळगाव

जळगाव (Crime today news) |  रात्रीच्या वेळी चोरी, घरफोडी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोन जणांना मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी रात्री वाजता हॉटेल कस्तूरी आणि मेहरूण परिसरातून एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांबाबत नोंद घेण्यात आली.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हे मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी रात्री गस्तीवर असतांना रात्री ११.३० वाजेच्या सुमारास  हॉटेल कस्तुरीजवळ महेश संतोष भोई (वय-२०, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) हा चोरी करण्याच्या उद्देशाने  फिरताना आढळून आला होता. तसेच मेहरुण स्मशानभूमीजवळ राजेश माणिकराव राठोड (वय-२३, तांबापुरा, जळगाव ) हा चोरी, घरफोडीच्या उद्देशाने चेहरा झाकून संशयास्पदरित्या फिरताना रात्री आढळून आला. एमआयडीसी पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांबाबत नोंद घेण्यात आली.

यांची यशस्वी कामगिरी
ही कारवाई पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, सचिन पाटील, विकास सातदिवे, सुधीर साळवे, गणेश शिरसाळे, ललित नारखेडे, आकाश राजपूत, ईश्वर भालेराव यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *