अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे अन् जीवेठार मारण्याची धमकी

गुन्हे जामनेर

जामनेर (३ जानेवारी) । जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल वर्तन करून विनयभंग करणाऱ्या एकाला पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जामनेर तालुक्यातील डोहरी तांडा येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १५ डिसेंबर रोजी अल्पवयीन मुलीला गावातील नितेश शंकर राठोड याने त्याच्या घरी बोलावले. त्यानंतर मुलीसोबतल अश्लिल वर्तन करून तिचा विनयभंग केला. तसेच तु जर तुझ्या आईचे सोन्याचे दागिने आणले नाही तर मी गावात तुझी बदनामी करेल व माझ्या मोबाईल मधील फोटा व्हायरल करेल अशी धमकी देत जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सोमवारी ३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी नितेश राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *