नेपाळ (क्राईम टूडे न्यूज ) । नेपाळच्या यति एअरलाईन्स विमान पोखरा येथे लॅन्डिग करत असतांना जमिनीवर कोसळल्याची घटना आज सकाळी घडली आहे. या दुदैवी अपघातात ३० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे एका वृत्तवाहिनीद्वारे समोर आले आहे. भीषण अपघातानंतर विमान कोसळताच आगीने मोठा पेट घेतला.
विमान कोळल्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले असून या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बचावकार्य करतानाचे फोटो समोर आले आहे. विमानाचा अपघात झाल्यानंतर आगीचे लोट आणि मोठ्या प्रमाणात धुराचे लोट असल्यामुळे बचावकार्य करताना अडचणी येत असल्याचं दिसतेय. मृताची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दुर्घटनाग्रस्त विमानात दहा विदेशी नागरिक प्रवास करत असल्याचं समोर आले आहे. यामध्ये पाच भारतीय होते.
हवामान खराब असतानाही यती एअरलाइनच्या एटीआर-७२ विमानाने उड्डाण केले होते. हे विमान लॅन्डीग करतांना कोसळल्याने ३० प्रवासींचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहे.