घरातील एकुलत्या एक मुलाने गळफास घेवून जीवन संपविले
जळगाव (प्रतिनिधी) – तरुणाने आपल्या व्हॉटसॲपवर भावपूर्ण श्रध्दांजलीचे स्टेटस ठेवत, मृत्यूपूर्वी स्वत:लाच श्रध्दांजली दिली अन् गळफास ठवेनू आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रूक येथे घडली आहे. ऋषिकेश (गोलु) दिलीप खोडपे (२५) असे या मयत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही.
नेरी बुद्रुक येथे ऋषीकेश कुटुंबियासह वास्तव्यास होता, शनिवारी रात्री रात्री ९ चे सुमारास त्याने व्हाट्स अँप वर मूड ऑफ असे स्टेटस होते, तररविवारी आपल्या व्हाट्स अँप वर भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस ठेवले, त्यानंतर त्याच्या चुलत भाऊ प्रदीप खोडपेला फोन केला, मी तुला सोडून जात आहे. त्याने ऋषीकेशला विचारले तू कोठे आहे, तर त्याने सांगितले, मी गोरख बाबांच्या शेतात आहे. त्याठिकाणी गेले असता त्यांना ऋषीकेश हा शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. घटनेची माहिती मिळाल्यावर गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली, जामनेर पोलिसांनी ऋषीकेश यास खाली उतरवुन जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ऋषीकेश यास मयत घोषित केले.
शनिवारी रात्री गावात असलेल्या सप्ताहाच्या धार्मिक कार्यक्रमात ऋषिकेश यांनी सहभाग घेतला. त्यानंतर प्रदीप खोडपेला फोन करून सांगितले की, मी तुला सोडून जात असा फोन करुन शेतात गळफास घेतला. ऋषिकेशला दोन बहिणी व आई, वडील असा परिवार आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. कुठल्यातरी कारणमुळे ऋषीकेश नैराश्यात आला असावा व त्याने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत जामनेर पोलिसात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरुन जामनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अतुल पवार हे करीत आहेत
#jalgaonnews#crimenews#youthsusaid#whatsappstatus