ट्रक-कंटनेरच्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी

अपघात धरणगाव

धरणगाव (Crime today news) | ट्रक आणि कंटेनर यांची समोरासमोर झालेल्या भीषण अपघात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्याजवळील पुलावर सोमवारी ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात वाहनांवरील दोघे वाहन गंभीररित्या जखमी झाले असून त्यांनी जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे.

धरणगाव तालुक्यातील मुसळी फाटासमोरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पुलावर जळगावकडून येणारा ट्रक क्रमांक (एमएच ४० वाय १३०८) व एरंडोलकडून येणारा कंटेनर (एमएच ४० सीटी ४०३५) यांच्यात समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. हा अपघात रविवारी ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता दुपारी घडला आहे.

या घटनेत दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना नागरिकांनी कॅबिनचा पत्रा तोडून बाहेर काढण्यात आले होते. एरंडोल कडून येतांना डाव्याबाजूला रस्त्याचे काम सुरु होते. त्यामुळे उजव्या बाजूने येणारे व जाणारे दोन्ही कडचे वाहने जात असतांना दोन्ही गाड्या एकमेकांवर धडकल्यामुळे हा अपघात झाला होता. दरम्यान अपघात झाल्याचे लक्षात येताच काही नागरिकांनी अपघातस्थळी धाव यातील ट्रक चालक अरविंद माधव प्रसाद वय-३९ रा. भोपाल, मध्यप्रदेश याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर दुसर जखमी असलेला अज्ञात चालकाला खासगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *