Featured Video Play Icon

VEDIO देवालाही सोडलं नाही…पाहा चोरट्यांनी मंदिरात जावून काय केलं…

video गुन्हे ठळक बातम्या धुळे

सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

धुळे (क्राईम टुडे टीम) :  धुळे शहरात गेल्या कित्येक दिवसांपासून चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. घरे फोडणाऱ्या चोरट्यांनी आता मंदिरावर लक्ष्य केलं असून देवालाही सोडलं . धुळे शहरातील वाडीभोकर रोडवर असलेल्या उत्तरमुखी हनुमान मंदिरातील दानपेटीच चोरट्यांनी चोरून नेली असल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

उत्तरमुखी मारुती मंदिर अगदी रस्त्यावर आहे आणि त्यात काही अंतरावर देवपूर पोलिस स्टेशन असल्यामुळे या चोरीची अधिकच चर्चा होत आहे.

काल मध्यरात्रीच्या सुमारास दोघा चोरट्यांनी दुचाकीवरून येत ही दानपेटी चोरून नेली आहे. या चोरट्यांच्या दानपेटी चोरी करतांनाच्या सर्व हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या असून आता देवपूर भागातील नागरिक या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *