चालत्या बसमधून निघाला धूर ..काही वेळातच भीषण आग.. प्रवाशांचे काय झाले ते पहा..

गुन्हे ठळक बातम्या राज्य

आगीत बस जळून खाक, चालकामुळे सतर्कतेमुळे प्रवाश्यांचा जीव वाचला..

मुंबई (क्राईम टुडे टीम) : नवी मुंबई परिवहनच्या कल्याण-डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या बसला प्रचंड मोठी आग लागल्याची घटना गुरवारी सकाळी  खोणी-तळोजा रस्त्यावर घडली. या आगीत बस जळून खाक झाली आहे. दरम्यान चालकाच्या सतर्कतेमुळे वेळीच प्रवासी बसमधून खाली उतरल्याने प्रवाश्यांचा जीव वाचला आहे. दरम्यान बसला आग लागल्याच्या व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

 

नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाच्या बसला गुरुवारी सकाळी साडे दहाच्या सुमारस खोणी-तळोजा रस्त्यावरील नागझरी बस थांब्याजवळ अचानक आग  लागली. यावेळी बसच्या चालकाने प्रसंगावधान राखून प्रवाशांना वेळीच सावध बसून बाहेर काढले.त्यामुळे  जीवितहानी टळली आहे.मात्र बस काही वेळात पेट घेतला.काही क्षणात बसच्या चारही बाजुंनी आग लागली आणि भीषण बस आगीत खाक झाली. अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहचले.त्यांनी तात्काळ आग विझवली.आगीत बसची आसन व्यवस्था, यंत्रसामुग्री जळून खाक झाली, अशी माहिती परिवहन विभागातील अधिकाऱ्याने दिली आहे.तर शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा संशय अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *