सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी लाच घेतांना झाली अटक
जळगाव (प्रतिनिधी)- महिला तलाठीस तीनशे रूपयांचा मोह चांगलाच महागात पडला आहे. भुसावळ तालुक्यातील साकरी येथील महिला तलाठ्यास मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने तीनशे रुपयांची लाच घेतांना रंगेहात अटक केल्याने खळबळ उडाली आहे.मनिषा निलेश गायकवाड, वय-३८, रा.मोरेश्वर नगर, साकेगाव शिवार, भुसावळ असे अटकेतील महिला तलाठ्याचे नाव आहे.
भुसावळ शहरातील तक्रारदाराने नविन खरेदी केलेल्या प्लॉटच्या ७/१२ उताऱ्यावर नाव लावणेसाठी साकरी येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. उतार्यावर नाव लावण्यासाठी तलाठी मनिषा गायकवाड यांनी तीनशे रूपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती.
*ज्याठिकाणी रोजीरोटी..त्याच ठिकाणी घेतली लाच*
त्यानुसार जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज तलाठी कार्यालयात सापळा रचला आणि तक्रारदाराकडून तीनशे रुपयांची लाच घेतांना तलाठी मनिष गायकवाड यांना रंगेहाथ अटक केली. पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरक्षिक संजोग बच्छाव , महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल शैला धनगर, ईश्वर धनगर, राकेश दुसाने यांच्यासह पोलीस निरिक्षक एन.एन.जाधव, बाळू मराठे, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहिरे, सुनील पाटील, रविंद्र घुगे, जनार्दन चौधरी, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रणेश ठाकूर, प्रदीप पोळ, सचिन चाटे, अमोल सुर्यवंशी, महेश सोमवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
#Bhusawalnews#anticurptionnews#talathidemand#crimenews