मतीमंद असल्याचा फायदा घेत तरुणीवर अत्याचार…. झाली तीन महिन्यांची गर्भवती

गुन्हे जळगाव

जळगाव (क्राईम टू डे टीम ) । जळगाव पारोळा तालुक्यातील मतीमंद तरुणी अत्याचार होवून अत्याचारातून मतीमंद तरुणी तीन महिन्यांची गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पिडीत तरुणीच्या आईच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, पारोळा तालुक्यातील पिडीता एका भागात आपल्या परिवारासह राहते. पिडीतेची आई शेत मजुरी करुन परिवाराचा उदरनिर्वाह करते. आई शेतात गेल्यानंतर मतिमंद तरुणी ही घरी एकटीच रहायची. दि. १२ जानेवारी रोजी पिडीतेने अचानक आपल्या पोटात दुखत असल्याचे आईला सांगितले. यानंतर आईने तिला शहरातील एका रुग्णालयात दाखवले असता त्यांनी धुळे येथील मेडीकल कॉलेज दाखवण्याचा सल्ला दिला. धुळे येथे पिडीतेची तपासणी केली असता डॉक्टरांनी पिडीता तीन महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती दिली. पिडीता मतिमंद आणि घरी एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर लैंगीक अत्याचार झाल्याची शक्यता पिडीतेच्या आईने व्यक्त केली असून याप्ररकणी पिडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरुध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *