शेतात आलेल्या वीज वितरण सहाय्यक अभियंत्याला शेतकऱ्यानं वायरनं मारहाण केली आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. यावतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील पिंपरी सावित्री गावातील घटना आहे.
यावतमाळ (क्राईम टूडे न्यूज) – यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेतात आलेल्या वीज वितरण सहाय्यक अभियंत्याला शेतकऱ्यानं वायरनं मारहाण केली आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. यावतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील पिंपरी सावित्री गावातील घटना आहे.
या व्हिडीओमध्ये शेतकरी अभियंत्याला वायरनं मारहाण करताना दिसून येत आहे. प्रकाश देहारकर असे मारहाण करणाऱ्या संशयित आरोपी शेतकऱ्याचं नाव आहे. वीज जोडणी न मिळाल्यामुळे शेतकऱ्याने तात्पुरत्या स्वरुपात केबल टाकून शेताला पाणी देण्याची व्यवस्था केली होती. मात्र, हे कळताच तातडीने या बेकायदा वीज जोडणीची पाहणी करण्यासाठी महावितरणचे अभियंते शेतात आले. अभियंते शेतात येताच संतप्त झालेल्या शेतकऱ्याने एका अभियंत्याला वायरनं बेदम चोप दिला. यवतमाळमध्ये हा प्रकार घडला आहे. प्रकाश देहारकर या शेतकऱ्यानं वीज जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज केला होता. मात्र वीज जोडणी मिळाली नसल्यानं देहारकर याने तत्पुरत्या स्वरुपात केबल टाकून शेतात सिंचणाची व्यवस्था केली. मात्र ही बातमी वीज वितरण विभागाला कळाल्यानंतर सहाय्यक अभियंता गिरी हे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेल्याने हा प्रकार घडला आहे. याबाबत पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.