दिवाळी सण संपला नाही तोच रामनगर परिसरात टवाळखोरांनी डोकं वर काढलं आहे. रामनगर टाकी चौक परिसरात रस्त्यावर पार्कींग केलेल्या दुचाकी अज्ञात टवाळखोरांना पेटवून दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
पुणे (क्राईम टुडे न्यूज) – दिवाळी सण संपला नाही तोच रामनगर परिसरात टवाळखोरांनी डोकं वर काढलं आहे. रामनगर टाकी चौक परिसरात रस्त्यावर पार्कींग केलेल्या दुचाकी अज्ञात टवाळखोरांना पेटवून दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
पुणे शहरातील वारजे परिसरात असलेल्या रामनगरातील पाण्याची टाकी चौकात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन दुचाकी अज्ञात टवाळखोरांनी पेटवून दिल्या आहेत. तर एका चारचाकी वाहनाची काच फोडून वाहनांचे नुकसान केले आहे. दुचाकीच्या लागलेल्या आगीने शेजारील एका रिक्षाचे देखील काही प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना गुरूवारी १६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास घडली आहे.
हीरो होंडा या दुचाकीवरून गेलेल्या अज्ञात २ व्यक्तींनी हा प्रकार केला असावा, अशी शक्यता नागरिकांकडून वर्तविली जात आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याबाबत स्थानिक गाडी मालकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वारजे माळवाडी पोलीस दाखल होत. माहीती घेण्याचे काम सुरू आहे.
यामध्ये एक चारचाकी एक रिक्षा व तिन दुचाकींचा समावेश आहे. २०१७ नंतर रामनगर परीसरात वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार थांबला होता. परंतु आज पुन्हा टवाळखोरांनी तोंडवर काढुन आज सामान्य नागरीकांच्या वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरीक संतप्त झाले आहेत. यावर योग्य ती कारवाई करीत रामनगर परीसरात पोलीस गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.