फटाके देण्याचे आमिष : मुलावर लैंगिक अत्याचार !

गुन्हे राज्य

फटाके देण्याचे आमिष दाखवून आठ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका ३२ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. 

मुंबई (क्राईम टुडे न्यूज) – फटाके देण्याचे आमिष दाखवत एका मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून एका तरूणाला अटक करण्यात आली आहे.  अल्पवयीन मुलगा घराजवळ फटाके फोडत असतांना त्याला फटाके देण्याचे अमिष देऊन आरोपीनं त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. एवढेच नाही तर हा प्रकार कुणाला सांगितला तर जीवेठार मारण्याची धमकी दिली होती. याबबात अँटॉप हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर मुलगा घरी गेला, तेव्हा त्यानं कोणाला काहीही सांगितलं नाही. मात्र आई-वडिलांनी त्याला रडताना पाहून कारण विचारलं असता, त्यानं घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर अँटॉप हिल पोलिसांनी तक्रार नोंदवून आरोपीला अटक केलील आहे. याच आरोपीवर यापूर्वीही छळाचे दोन गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती देखील अँटॉप हिल पोलिसांनी दिली आहे.

आरोपीला मंगळवारी अटक करण्यात आली आणि पोलिसांनी प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (पोक्सो) कायद्याच्या कलमांखाली एफआयआर नोंदवला. अँटॉप हिल पोलिसांनी सांगितले की, आरोपींवर यापूर्वीही छळवणुकीचे दोन गुन्हे दाखल आहेत.

घाबरलेल्या अवस्थेत पीडित मुलानं घरी येऊन सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर बुधवारी अँटॉप हिल पोलिसांनी अनैसर्गिक छळ, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. तो कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. आरोपींविरुद्ध अँटॉप हिल, माटुंगा पोलिस ठाण्यात विनयभंग, असभ्य वर्तनाचे दोन गुन्हे दाखल आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *