दुदैवी घटना : भाऊबीजेला घरी जातांना रेल्वेतून पडल्याने शिक्षकाचा मृत्यू

जळगाव

शिक्षक म्हणून नोकरीला असलेल्या २२ वर्षीय तरूणाचा कल्याणहून बऱ्हाणुपर येथे गावी जात असतांना अचानक धावत्या रेल्वेतून पडल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

जळगाव  (क्राईम टूडे न्यूज) – जळगाव शहरातील एका शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला असलेल्या २२ वर्षीय तरूणाचा कल्याणहून बऱ्हाणुपर येथे गावी जात असतांना अचानक धावत्या रेल्वेतून पडल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोबत असलेल्या मोबाईलच्या आधारे त्याची ओळख पटविण्यास जळगाव रेल्वे पोलीसांना यश आले आहे.  विजय शाम सोनी (वय-२२) रा. बऱ्हाणपुर मध्यप्रदेश ह.मु. जळगाव असे मयत झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.

मयत विजय शाम सोनी हे जळगावातील रूस्तमजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला होते. ते मुळ रहिवाशी मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुर येथील रहिवाशी आहेत. दरम्यान दिवाळी निमित्त ते कल्याण येथील मामांकडे भेटण्यासाठी गेले होते. कल्याणहून परत ते मुळगावी बऱ्हाणपुर येथे जाण्यासाठी बुधवारी १५ नोव्हेंबर रोजी रेल्वेने प्रवास करीत आहे.

जळगाव ते शिरसोली दरम्यान रेल्वेतून प्रवास करत असतांना रेल्वे खंबा क्रमांक ४०७जवळ धावत्या रेल्वेतून विजय सोनी हे पडले. त्यात सचिन सोनी हे गंभीर जखमी झाले. ही घटना घडल्यानंतर जळगाव रेल्वे पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल सचिन भावसार यांनी घटनास्थळी धाव घेवून जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी मयत घोषीत केले. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सचिन भावसार करीत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *