चोपडा (क्राईम टुडे न्यूज) चोपडा तालुक्यात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. ही कारवाई चोपडा शहर पोलीसांनी केली असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात टोळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा रचून केली अटक
चोपडा ते धरणगाव रोडवर असलेल्या तापी सुत गिरणीच्या पुढे एका वळणावर काही दरोडेखोर टोळीच्या माध्यमातून दरोडा टाकण्यासाठी वाहनातून येत असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांच्या सूचनेनुसार चोपडा शहर पोलिसांनी बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेचार ते साडेसहा वाजेच्या दरम्यान सापडारातून मोठ्या शितापीने टोळीतील ५ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीसांनी संशयितांकउून दरोडा टाकण्यासाठी लागणारे सोहित्य, जनरेटर आणि पिकअप वाहन असा एकुण ८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
हे आहेत दरोडेखार
याप्रकरणी पोहेकॉ दीपक विसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दरोडेखोर दादला सिराम नरगावे (वय-२०) रा.किरचली ता. सेंधवा जि. बडवाणी मध्यप्रदेश, सियाराम बेलोरसिंग चव्हाण (वय-२३) रा. झेंडीखोद्री ता. सेंधवा जि. बडवाणी मध्यप्रदेश, जगदीश दमडीया नरगावे (वय-२४) रा. किरचली ता. सेंधवा जि. बडवाणी मध्यप्रदेश, ऋषिकेश रामलाल सोलंकी (वय-१९) रा. कुमठाना ता. सेंधवा जि. बडवाणी मध्यप्रदेश, अर्जुन बळीराम आर्य (वय-१९) रा. झेंडेखोद्री ता. सेंधवा जि. बडवाणी मध्यप्रदेश याच्यासह इतर ३ ते ४ जणांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहे. दरम्यान, या दरोडेखोरांकडून अजून काही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे.