कर्मचाऱ्यांमध्ये पसरली भिती…पोलिस, श्वानपथकासह अधिकारी घटनास्थळी दाखल
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील एमआयडीसी परिसरातील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन येथे आज अचानक दहशदवादी घुसले, त्यांनी सुरक्षारक्षकांवर गोळीबार करत काहींना ओलीस सुध्दा ठेवले, घटनेची माहिती पोलिसांना मिळाली, पेालीस आणि दहशतवादी यांच्या चकमक झाली. अखेर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले अन् चारही दहशतवाद्यांना जेरंबंद केले. असा थरारक प्रसंग भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन येथील कर्मचाऱ्यांना अनुभवला. मात्र खरोरचा हल्ला नव्हता, तर हे जिल्हा पोलीस दलाचे मॉक ड्रील (प्रात्यक्षिक) होते, हे माहितीपडल्यावर सर्व कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.
जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन येथे शनिवारी सकाळी ११ ते दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान दहशतवादी हल्याप्रसंगी करावयाचे कार्यपध्दतीचे प्रात्यक्षिक जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सादर करण्यात आले. हुबेहुब दहशतवादी, गोळीबार, अन् पोलीस बंदोबस्त अशा या थरारक प्रात्यक्षिकाने सर्वच भारावले होते. पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या सुचनेनुसार शनिवारी हे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
दहशतवाद्यांनी हल्ला केल्यास काय करालं- पोलिसांचे आवाहन
चार दहशत वादी यांनी पेट्रोलियम कॉर्पोरेशन मध्ये गेटमधून प्रवेश केला, त्यानंतर त्यांनी सुरक्षारक्षकांवर गोळीबार केला, कंपनीने ही माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली, घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी दहशतवादी हल्ला विरोधी शाखेचे पथक, एमआयडीसी पोलीस ठाणे, क्युआरटी पथक, बॉम्ब शोधक व नाशक, श्वानपथक, आरसीपीप्लाटून पोलीस फॉरेन्सिक युनीट, स्थानिक गुन्हे शाख, अग्नीशमन बंब, रुग्णवाहिका, यांच्यासह विविध विभागांचे अधिकाऱ्यांनी याठिकाणी पाचारण केले. पोलीस कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली, ओलीस ठेवलेल्या नागरिकांना सुखरुप सोडविले व दहशतवाद्यांना अटक केली, असे थरारक प्रात्यक्षिक याठिकाणी पार पडले. अशाप्रकाराची आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास पोलिसांनी काय करावे, नागरिकांनी प्रसंगावधान राखून काय काळजी घ्यावी, याबाबत प्रात्यक्षिकाव्दारे माहिती देण्यात आली. तसेच असा प्रसंग उद्भवल्यास पोलीस नियंत्रण कक्षाच्या ०२७२२२३३३ या अथवा टोल फ्री ११२ या क्रमाकांवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
#jalgaonnnews#teriristattack#policemockdril#jalgaonpolice