चाळीसगाव (क्राईम टुडे न्यूज)– चाळीसगाव शहरातील पोतदार शाळेजवळ एका तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. खून करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी चाळीसगाव पोलिसांनी धाव घेऊन चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे
चाळीसगाव शहरातील राहणाऱ्या दिनेश उर्फ भावडू पवार (वय-३५, रा. पवार वाडी, चाळीसगाव) हा तरुण आपला परिवारासह वास्तव्याला आहे. शहरातील पोतदार हायस्कूलजवळ रविवारी १५ जून रोजी सायंकाळी ७ वाजता त्याचा खून करण्यात आला. हा कोणत्या कारणावरून झाला, हे जरी स्पष्ट झालेले नसले तरी चाळीसगाव शहरासह तालुक्यात मोठी खळबळ मारली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला आहे. एकीकडे सर्वजण मकरसंक्रांत सण साजरी करत असताना शहरात तरुणाचा खून झाल्याने मोठी खळबळ माजली आहे .