गावठी पिस्तूलासह दोन तरुणांना अटक; शनिपेठ पोलिस पथकाची कारवाई

गुन्हे जळगाव

जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील नेरीनाका येथे गावठीकट्टा घेऊन फिरणाऱ्या दोन जणांना शनिपेठ पोलिसांनी रविवारी २१ जुलै रोजी दुपारी ४ वाजता अटक केली आहे याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की जळगाव शहरातील नेरी नाका परिसरामध्ये संशयित आरोपी गणेश हिमंत कोळी (वय-२३, रा.धानोरा ता. चोपडा जि. जळगाव ह ल.मु. मोहाडी ता. जळगाव ) हा हातात गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी उत्पादकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार पोउनि चंद्रकांत धनके व सोबत पोकॉ अनिल कांबळे, पोकॉ मुकुंद गंगावणे. पोकॉ विकी इंगळे, पोकॉ रविंद्र साबळे, पोकॉ अमोल वंजारी यांनी कारवाई करा संशयित आरोपी गणेश कोळी याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेल्या गावठी कट्ट्याबाबत विचारपुस केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देत होता पोलिसांनी खाक्या  दाखवताच सांगितले की हा गावठी कट्टा मित्र विनय जितेंद्र कोडी याच्याकडे जिल्हा असलेले सांगितले त्यानुसार पोलिसांनी मोहाडी शिवारातील उमेश पार्क येथील शेतात जाऊन गोठ्यातून गावठी कट्टा जप्त केला आहे शिवाय याला सहकार्य करणाऱ्या
विनय जितेंद्र कोळी वय ३४,  रा. मोहाडी ता.जि. जळगाव याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी पोकॉ पोकों अनिल कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास  पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *