मोठी बातमी : जामनेरात पोलीस ठाण्यावर संतप्त जमावाकडून तुफान दगडफेक; ठिकठिकाणी जाळपोळ

गुन्हे जळगाव जामनेर

जामनेर (क्राईम टुडे न्यूज) : जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथील चिमुकलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या फरार आरोपीला भुसावळ शहरातून अटक केली होती, दरम्यान या आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीसाठी संतप्त जमा करून जामनेर शहरात रास्ता रोको आंदोलन करत जाळपोळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी २० जून रोजी रात्री १० ते ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. या दगडफेकीमध्ये अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी हे जखमी झाले आहे.

जामनेर तालुक्यातील चिंचखेडा गावातील सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्दयपणे खून करण्यात आल्याची घटना मंगळवार ११ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता उघडकीला आली होती. या घटनेतील संशयित आरोपी  संशयीत आरोपी सुभाष इमाजी भिल वय-35 रा. चिंचखेडा ता. जामनेर तेव्हापासून फरार झाला होता. याबाबत जामनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. अखेर स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ पोलिसांच्या मदतीने गुरुवार २० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता भुसावळ शहरातील तापी नदी परिसरातून अटक केली होती.

दरम्यान संशयित आरोपीला अटक झाल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांसह समाजबांधवांनी जामनेर शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी ६ वर्षे मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणारा आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीसाठी संतप्त जमावाकडून जामनेर शहरात ठीकठिकाणी जाळपोळ करण्यात आली तर जमावाकडून जामनेर पोलीस ठाण्यावर दगडफेक करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान या दगडफेक मध्ये काही पोलीस कर्मचारी व अधिकारी हे जखमी झाले असून ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जळगाव शहर आणि इतर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांना जामनेर शहरात पाचारण करण्यात आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जामनेर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान या घटनेतील दगडफेक मध्ये जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे जखमी झाले असून त्यांना जामनेर येथील जिल्हा उप रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणातील काही सात ते आठ संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याचे समोर आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *