जळगाव (क्राईम टुडे न्यूज ) – उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने ताब्यात घेतलेल्या घरात बेकायदेशीरित्या वास्तव्याला आढळून आल्याचा प्रकार जळगाव तालुक्यातील आमोदा येथे १९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता उघडकीला आला होता. याप्रकरणी अखेर २० जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आमोदा येथील घर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने ताब्यात घेतले होते. दरम्यान २३ डिसेंबर दुपारी ४ ते १९ जानेवारी दरम्यान गावात राहणारे गोविंद चिंधू कोळी, चिंधू कोळी, आणि निर्मला चिंधू कोळी सर्व रा. आमोदा ता.जि.जळगाव हे सिल केलेल घर बंद घराचे कडी कोयंडाचे नट खोलून आत प्रवेश करत बेकायदेशीररित्या राहत होते. दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे कर्मचारी अर्जून शेरकर यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण इंगळे हे करीत आहे.