मुक्ताईनगर क्राईम टुडे न्यूज । जळगावातील मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तक चौकमध्ये असलेल्या तीन दुकानांना अचानक आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या आगीत सुमारे 5 ते 6 लाखांचे मोठे नुकसान झाले आहे. ही आग कशामुळे लागली याबाबत समजून आले नाही. अग्निशमन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन बंबाद्वारे ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे
मुक्ताईनगर शहरामध्ये मधोमध असणाऱ्या परिवर्तन चौकाच्या लगतच दोन ते तीन दुकानांना अचानक आग लागल्याची घटना गुरुवारी 30 नोव्हेंबर रोजी रात्री घडली आहे. आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू होते. सर्वसामान्य जनतेने आग विझवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून आले.
अचानक लागलेल्या भीषण आगीत बूट व चप्पल चे दुकान तसेच गोळी बिस्किट पान मसाल्याचे दुकान व किराण्याचे दुकान जळालेले दिसून आले. अंदाजे एकूण नुकसान पाच ते सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज समोर आला आहे.
हे आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही, दरम्यान यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी मदत केल्याचे पाहायला मिळाले.
दुकानांना आग लागले ते समजतात मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बोदवड नगरपरिषद इथून अग्निशमनची बंब बोलवून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मुक्ता नगर पोलीस ठाण्यात आग लागल्याबाबतची नोंद घेण्याचे काम सुरू होते