क्राईम टूडे न्यूज । पांढरा शुभ्र सदरा-पायजमा, चकचकीत कार आणि अंगात पुढारी बाणा अंगिकारलेल्या अट्टल घरफोड्याला गुन्हेशाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. तोच तोर्रा त्याने पोलिसांना दाखवला. पण, पोलिसांची पाटिलकी या भामट्यावर भारी पडली अन् घडा उलटा करावा तशाच याला उलटा करताच गुन्ह्यांची सरबत्तीच लागली. तब्बल एकतीस मोठ्या घरफोड्यांची कबुली एका मागून एक दिल्याने तपास पथकाच्याही भुवया उंचावल्या. घरफोडीतील सोने,कार आणि इतर मुद्देमाल त्याने काढून दिला आहे. प्रविण सुभाष पाटील (वय-३२) रा. बिलवाडी ता.जि.जळगाव असे घरफोड्या करणाऱ्या पुढाऱ्याचे नाव आहे.
संशयित आरोपी प्रविण पाटील याचा गेल्या वर्षभरात गाव-तालूक्यासह, रवा (ता.पारोळा), म्हरुण (ता.चाळीसगाव) आणि विशेष करुन त्याच्या नातेसंबधातील गाव-खेड्यांमध्ये जावुन तो, तरुणांना आपल्या प्रभावी बोलण्यातून छाप टाकत होता. सामाजीक कामाच्या नावाखाली “देवा” या नावाने ग्रृपही तयार केला हेाता. अनेक तरुण त्याच्या संपर्कात होते. मात्र, त्याच्या घरफोडीच्या धंद्यात अद्यापतरी कुणी सहभागी त्याने करुन घेतला नाही. अशी माहिती समोर आली आहे.
अश्या आळल्या मुसक्या !
नुकतीच ग्रामपंचायीत निवडणुकांचा धुराळा शांत झाला. जळगाव तालूक्यातील बिलवाडी ग्रामपंचायत ताब्यात घेण्याच्या उद्देशाने प्रवीण पाटिल याने स्वतःचे पॅनल उभे करुन निवडणुक लढविली. काही वर्षांपुर्वी आपल्यादेखत भटकणारा बेरोजगार प्रवीण चक्क पैशांची उधळण करतोय, स्वतःला सरंपच करुन घेण्यासाठी त्याने निवडणुकीच्या दोन रात्रीतून बारा लाख रुपयापर्यंत वाटप केल्याने संपुर्ण गाव तालूक्याचे त्याच्याकडे लक्ष वेधले गेले.गावातील तरुणांच्या पार्ट्या,मैफली संपल्या प्रवीण भाऊ निवडणुकीत बेक्कार पडले. तरी, गम ना पछतावा..परत होता तोच रुबाब कायम असल्याने ग्रामस्थांच्या डोळ्यात हे सर्व खटकत होते. त्याचीच माहिती गुन्हेशाखेच्या खानदानी पाटिल पोलिसाला लागली. दोन दिवस पाळत ठेवुन प्रवीण भाऊंना घेतलं ताब्यात..पोलिस म्हणजे किरकोळ असा दुराग्रह झाल्याने रुबाब दाखवताच पोलिसांनी खाक्या दाखवत आणले जळगावी.
पाच वर्षांपासून काम फत्ते करून
प्रवीण पाटिल हा साधारण पाच वर्षांपासुन चोऱ्या घरफोडीच्या धंद्यात आहे. खास करुन नाते संबधाच्या गावात चार-दोन दिवस राहुन रेकी करायची अन् काम फत्ते करुन पेाबारा करायचा. प्रत्येकच गुन्हा त्याने एकट्याने केल्याने आजवर तो, पेालिसांना मिळून येत नव्हता. वाळूचा धंदा आहे अशी बतावणी त्याने करुन ठेवल्याने ग्रामीण भागात त्याच्यावर विश्वासही ठेवला गेला. मात्र,कोरोना काळा नंतर तो, सक्रिय होवुन ग्रामपंचायत निवडणुकीत उभा राहताच त्याची कुंडली उघड झाल्याचे बोलले जात आहे.
व्हाईट कॉलरचे स्वप्न धुळीस
प्रवीण पाटिल याला राजकारणात येवुन घरफेाडीचा धंदा पुर्णतः सोडून द्यायचा होता. मात्र, निवडणुकीत १२ लाख खर्चुनही निम्मे पेक्षाही कमी मते त्याला पडली.तेथूनच त्याचे वाईट दिवस सुरु होवुन गुन्हेशाखेला कुणकुण लागली. वरिष्ठ निरीक्षक किशन नजन पाटिल यांच्या पथकातील विजय पाटिल, महेश महाजन, विजयसींग पाटिल अशांच्या पथकाने प्रवीण पाटलाचे बिंग फेाडले. त्याला अटक करताच त्यान ३१ घरफोड्याची कबुली दिली आहे.