तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने एकाचा जागीच मृत्यू

गुन्हे जळगाव

दिपावली निमित्त घराच्या बाल्कनीमध्ये साफसफाई करत असतांना करत असतांना अचानक पाय घसरून सोसाटीच्या तिस-या मजल्यावरून खाली पडल्याने ५० वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.

जळगाव (क्राईम टूडे न्यूज) : दिपावली निमित्त घराच्या बाल्कनीमध्ये साफसफाई करत असतांना करत असतांना अचानक पाय घसरून सोसाटीच्या तिस-या मजल्यावरून खाली पडल्याने उल्हासराव चंद्रराव पाटील (वय-५२, रा. नित्यानंद सोसायटी, मोहाडी रोड,जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळ साडे वाजेच्या सुमारास घडली आहे. घटना घडतांचा नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.

याबाबत अधिक असे की, उल्हासराव चंद्रराव पाटील हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह मोहाडी रोडवरील नित्यानंतर सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर वस्तव्याला होते. ते ममुराबाद येथील जिल्हा मृदा सर्व्हेक्षण व मृदा चाचणी विभागात कृषी पर्यवेक्षक म्हणून नोकरीला होते. सध्या दिवाळी असल्याने गुरूवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या बाल्कनीमध्ये साफसाफाईचे काम करत होते. साफसाफाई करतांना त्यांचा पाय घसरून तोल गेल्याने ते तिसऱ्या मजल्यावरून खाली पडले. त्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर परिसरात एकच गर्दी जमली होती. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील करीत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुवर्णा, मुलगा हितेश आणि मुलगी हर्षदा असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *