लग्न होत नाही असा पक्का विचार करून २४ वर्षीय तरूणाने गिरणा नदी पात्राजवळील एका शिसमच्या झाडाला बैलगाडीच्या जोत्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घडना समोर आली आहे.
चाळीसगाव (क्राईम टुडे न्यूज) । लग्न होत नाही असा पक्का विचार करून प्रशांत भगवान पाटील (वय-२४, पिलखेडा ता.चाळीसगाव जि.जळगाव) यातरूणाने गिरणा नदी पात्राजवळील एका शिसमच्या झाडाला बैलगाडीच्या जोत्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घडना समोर आली आहे. मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड गावात प्रशांत पाटील हा परिवारासह राहत होता शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, आपले लग्न होत नाही. शेतकरी असल्याने आपल्याला मुलगी कुणी देत नाही, असा विचार करून हे आपले जीवन जगून काही उपायोग नाही. असे आपल्या मेहुणे योगेश यांना बोलून दाखविले होते.
या विवंचनेतून प्रशांत पाटील याने उपखेड शिवारातील गिरणा नदी पात्राजवळील शिसमच्या झाडाला बैलगाडीच्या जोत्याने गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेवून तातडीने चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. हा प्रकार ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेला उघडकीला आला. मेहुणबारे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिपक नरवाडे करीत आहे.