अरे बापरे … दारूच्या नशेत गावगुंडांकडून सरपंचाला जीवेठार मारण्याची धमकी

गुन्हे यावल

यावल (क्राईम टुडे न्यूज) । येथील पंचायत समितीच्या आवारात सरपंचाशी तीन जणांनी दारूच्या नशेत वाद घालून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. अशा गावगुंडावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी डॉ. मंजूश्री गायकवाड यांना देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदचे उपाध्यक्ष तथा संरपंच सैय्यद असद सैय्यद जावेद अहमद यांनी हे निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, ३ नोव्हेंबर रोजी सरपंच सैय्यद असद हे यावल पंचायत समितीच्या आवारात प्रशासकीय कामासाठी आलेले होते. त्यावेळी पंचायत समितीच्या आवारात काही मद्यधुंद तीन जणांनी सरपंच सैय्यद असद यांचा रस्ता आडवून हुज्जत घातल दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य केले. त्याला  सरपंच सैय्यद असद यांनी विरोध केला असता तिघांकडून जीवेठार मारण्याची धमकी देण्यात आली.

दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर  सरपंच सैय्यद असद यांनी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. मंजूश्री गायकवाड यांना गावगुंडांवर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन दिले आहे. याप्रसंगी  सरपंच सैय्यद असद,माजी गटनेते शेखर पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *