तिघा परप्रांतीय मजुरावर काळाची झडप ; भिंत कोसळल्याने तिघे जागीच गतप्राण..

गुन्हे चाळीसगाव ठळक बातम्या

चाळीसगावातील एच एच पटेल या तंबाखूच्या कंपनीतील दुर्दैवी घटना….

जळगाव ( प्रतिनिधी ):  चाळीसगाव शहरातील एच एच पटेल या तंबाखूच्या कंपनीत भिंत कोसळून तीन मजूर ठार झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी रात्री घडली आहे. तिघेही मजूर हे परप्रांतीय असून घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. लतीफ विनीतकुमार जुमना प्रसाद चौरसिया(वय २४), मोहम्मद अकील साकील अली (वय २८), लतीफ रहीम बक्स ( वय ३०) सर्व रा.उत्तरप्रदेेश अशी मयत तिघांची नावे आहेत.

चाळीसगाव शहरात कन्नड रोडवर एच.एच पटेल हि तंबाखूची कंपनी असून या कंपनीमध्ये रविवारी रात्री मजूर हे गटारीचे बांधकाम करत होते. यावेळी अचानक काम सुरू असताना कंपनीच्या कुंपणाची संरक्षण भिंत कोसळली. यावेळी काम करणारे मोहम्मद अकिर साकिर अली, लतिफ विनीत कुमार जमुना प्रसाद चौरसिया व लतिफ रहीम बक्स या तिघांच्या अंगावर कंपनीची जुनी भिंत कोसळली यात भिंती खाली दाबले जावून तिघे मजूर जागीच गतप्राण झाले.

तिघांना तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोेषीत केेले. दरम्यान एच.एच.पटेल कंपनीच्या निष्काळजी पणामुळेेच तिघांचाही जीव केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. याप्रकरणी रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद चाळीसगाव पोेलिसात करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेत आणखी एक मजूर जखमी झाल्याची माहिती असून त्यात त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते.

कंपनीचे बांधकाम किती जुने आहे, याकडे कंपनी मालकाचे दुर्लक्ष झाले आहे का, कंपनीला नगरपालिकेकडून बांधकामाबाबत काही नोटीस देण्यात आली होती का? अचानक भिंत कशी कोसळली असे एक ना अनेक प्रश्न आता तिघा निष्पाप मजुरांच्या मृत्यूमुळे उपस्थित होत असून
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

#Jalgaonnews#crimenews#chalisgaonnews#wallincidentthreelabourdaith

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *