जळगाव शहर पोलीस ठाण्यात एका जणांविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी)- शहरातील एका भागातील नगरसेविकाला तिच्या मोबाईलवर फोन करुन अश्लिल शिवीगाळ करत, तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवार, १२ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात फोन करणाऱ्या व्यक्तीविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात ५३ वर्षीय महिला वास्तव्यास असून त्या महापालिकेत नगरसेविका आहेत. शनिवारी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास नगरसेविका ह्या त्यांच्या घरी असतांना, त्यांच्या मोबाईल वर ७९७२१३६५२१ या मोबाईल क्रमाकांवरुन अनोळखी व्यक्तीचा फोन आला. या अनोळखी व्यक्तीने फोनवरुन नगरसेविकाला लज्जा उत्पन्न होईल अशी अश्लिल शिवीगाळ केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी नगरसेविकेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन ७९७२१३६५२१ या क्रमाकांच्या अनोळखी व्यक्तीविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल ओमप्रकाश सोनी हे करीत आहेत.
#jalgaonnews#crimenews#corporatorwomen#jalgaonmunciplecorporation