पत्नी सकाळी झोपेतून उठली…पतीला पाहून तिने हंबरडाच फोडला
जळगाव (प्रतिनिधी ) – शहरातील सिंधी कॉलनीत एका दुकानदाराने नैराश्येतून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ७ वाजता उघडकीला आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुभाष कुंदनमुल लुंड (वय-५३) रा. सिंधी कॉलनी, जळगाव असे गळफास घेतलेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.
सिंधी कॉलनीत सुभाष लुंड हे आपल्या पत्नी राणीबाई लुंड यांच्यासह वास्तव्याला होते. याच परिसरात त्यांचे केकचे दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कर्जबाजारीमुळे त्यांचे दुकान बंद होते. त्यामुळे काही दिवसांपासून तणावात होते. शनिवारी रात्री ते जेवन करून झोपले होते. त्यांची पत्नी राणीबाई ह्या सकाळी झोपेतून उठल्यावर त्यांना पती सुभाष लुंड हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. हे बघून तिने हंबरडा फोडला. शेजारी राहणाऱ्या नागरीकांच्या मदतीने त्यांना खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सातपुते यांनी मयत घोषीत केले. सुभाष लुंड यांच्या आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
#jalgaonnews#crimenews#shopkeepersusaid