एकाच घरात तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये घेतला गळफास
नाशिक (क्राईम टुडे टीम) – नाशिकमधील सातपुर भागातील राधाकृष्ण नगरात एकाच कुटुंबातील वडीलांसह दोन्ही मुलांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी समोर आली आहे. दीपक शिरोडे (वय ५५) हे वडील तर प्रसाद शिरोडे (वय २५ ), व राकेश शिरोडे (वय २३) अशी मयत मुलांची नावे आहेत. या घटेनने नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सातपूर राधाकृष्ण नगर परिसरात रहिवासी दिपक शिरोडे यांचा शहरातील अशोक नगर बसस्टॉप येथे फळ विक्रीचा व्यवसाय करुन उदरनिर्वाह भागवित होते. रविवारी दिपक शिरोडे यांची पत्नी व आई हे कामानिमित्ताने बाहेर गेले होते, घरी दिपक शिरोडे, त्यांचा मोठा मुलगा प्रसाद व राकेश असे तिघे घरी होते. दिपक शिरोडे याच्याबरोबरच प्रसाद व राकेश अशा तिघांनी एकाच घरात तीन वेगवेगवेगळ्या खोलीत फॅनच्या हुकला दोरीने घेतला गळफास घेतला. पत्नी व आई घरी आल्यावर हा प्रकार आला समोर आला. दोघांनी एकच हंबरडा फोडला. घटना स्थळी सातपूर पोलीस दाखल झाले असून आर्थिक कारणावरून तिघांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
#nashiknews#crimenews#susaidfatherwithtwosons#satpurnews