आठवडाभरात तिसऱ्यांदा जळगाव जिल्हा पोलीस दलाचा गुन्हेगारांना दणका
चाळीसगाव (क्राईम टूडे प्रतिनिधी) – चाळीसगाव शहरात व तालुक्यातील वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यातील एका टोळीतील ११ गुन्हेगारांवर विशेष पोलीस महानिरीक्षकांना मोक्काची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या कारवाईमुळे गुन्हे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मोक्काची कारवाई
टोळी प्रमुख अमोल छगन गायकवाड (वय-२५) रा. स्वामी समर्थ कॉलनी, चाळीसगाव, सुमित उर्फ बाबा अशोकराव भोसले रा. नागद रोड, चाळीसगाव, कृष्णा छगन गायकवाड रा. चाळीसगाव, संतोष उर्फ संता पहेलवान रमेश निकुंभ रा. हिरापूर ता. चाळीसगाव, विकी उर्फ शुभम विजय पावले (वय-२३) रा. हिरापूर ता. चाळीसगाव, श्याम उर्फ श्याम नामदेव चव्हाण (वय-२४) रा. हिरापूर, चाळीसगाव, सचिन सोमनाथ गायकवाड (वय-२२) रा. बाबाजी चौक, चाळीसगाव, जयेश दत्तात्रय शिंदे पाटील (वय-२४) रा. भोरस खुर्द ता.चाळीसगाव, उद्देश उर्फ गुड्डू सुधीर शिंदे (वय-२४) रा. हिरापूर ता. चाळीसगाव, योगेश रतन पांचाळ (वय-२६) रा. हिरापूर ता.चाळीसगाव आणि पुष्पराज उर्फ सुनील जगताप रा. पिंपरखेड ता. चाळीसगाव यांचा समावेश आहे.
चाळीसगाव शहरात व तालुक्यात शांतता अबाधित राहावे, या अनुषंगाने पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील यांना आरोपींविरोधात मोक्का प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. या अनुषंगाने पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील यांनी गुन्हेगारांवर मोक्का कायद्याचे कलम वाढविण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यानुसार त्यांनी तो प्रस्ताव पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे सादर करण्यात आला. हा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी अवलोकन करून नाशिक परिक्षेत्र येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यांनी प्रस्तावाचे अवलोकन करून आरोपीतांवर गुन्हे अभिलेख तपासणी करून २५ जानेवारी रोजी वरील सर्व ११ गुन्हेगारांवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात मुक्का कायद्याखाली कलम लावण्यात आले.