भुसावळ (क्राईम टूडे न्यूज टिम) । भुसावळ शहराजवळील महामार्गावर एका ढाब्यावर जळगावच्या आरटीओ विभागाने आज दुपारी कारवाई करत विनाक्रमांकाचे तीन वाहने जप्त केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील विनाक्रमांकाच्या वाहनातून वाहतूक केली जात आहे. तसेच वाहनांची विनापरवाना मॉडीफीकेशन करून वाहतूक होत आहे. अशा वाहनांमुळे अपघात होवून जीवन हानी होवू शकते. या अनुषंगाने मिळालेल्या माहितीनुनसार जळगाव आरटीओ विभागाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांच्या उपस्थितीत आज भुसावळ शहरातील महामार्गावरील एका ढाब्यावर छापा टाकला. यात विना परवाना आणि विनाक्रमांकाचे दोन ट्रॅक्टर ट्रॉली आणि पाण्याचे टँकर आढळून आले. तिघे वाहने परिवहन विभागाने जप्त केली आहे. हे तिघे वाहने विनापरवानगीने बनिवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. रात्री उशीरापर्यंत संबंधित मालकांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.