पंढरपूर येथील हृदयद्रावक घटना, घटनेने शिक्षकांनीही बसला मोठा धक्का
सोलापूर (क्राईम टुडे टीम) :- पंढरपूर येथे इयत्ता तिसरी मधील विद्यार्थिनी वर्गात पेपर लिहीत असताना तिला अचानक झटका आला आणि यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वाजता घडली आहे. अनन्या अतुल भादुले वय ९ वर्ष असे मयत मुलीचे नाव आहे.
पंढरपूरच्या अरिहंत इंग्लिश स्कूल मधील ही दुर्दैवी घटना आहे. आज गुरुवारी अनन्या सकाळी 8 वाजता परीक्षा देण्यासाठी शाळेत आली.
आज मराठीचा पेपर होता अनन्याने संपूर्ण पेपर सोडविला. पेपर सुटण्यास काही वेळांचा अवधी असताना अनन्या ला झटका आला. तिने हातपाय वाकडे केले. हि अवस्था पाहून घाबरलेल्या वर्ग शिक्षकांनी तिला तातडीने उपचारासाठी हलविले मात्र उपचार सूरु होण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला होता. अनन्या ची तब्येत गेल्या दोन दिवसांपासून ठीक नव्हती तिला ताप येत होता असे समजते. आज सकाळी 10 वाजता हा दुर्दैवी प्रकार घडला. प्राथमिक माहितीनुसार अनन्याला ब्रेन हैम्रेज झाले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.