जळगाव (क्राईम टूडे टीम ) – अमळनेर शहरात दहशत माजविणारा आणि पोलीस ठाण्यात एकुण २७ गंभीर गुन्हे दाखल असलेला गुन्हेगार दाऊद याला जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नाशिक येथील कारागृहात रवानगी केली आहे.
शिवम उर्फ दाऊद उर्फ शुभम मनोज देशमुख (वय-२४) रा. पिंपळे रोड संविधान चौक, लाकडी वखारी मागे, अमळनेर असे गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर अमळनेर शहरात खून, दरोडा, जबरी लुट, धमकी, जबरी चोरी, पोलीसांच्या ताब्यातून पळून जाणे, सरकार नोकरांवर हल्ला असे वेगवेगळ्या एकुण २७ गंभीर दाखल आहेत. तया
गुन्हेगार शुभम उर्फ दाऊद उर्फ शिवम मनोज देशमुख हा गुन्ह्यात कारागृहातून सुटून पुन्हा शहरात दहशत निर्माण करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, तसेच त्याला कायद्याचा कोणताही धाक राहिलेला नव्हाता. सोबत काही शस्त्रे ठेवून नागरीकांना घाबरविण्याचा प्रयत्न करत होता. या अनुषंगाने अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी चौकशी पुर्ण करून ३ जानेवारी रोजी पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यानुसार पुढील कारवाईसाठी पोलीस अधिक्षक यांनी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना पाठविला. गुन्हेगाराची गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्षात घेवून जिल्हाधिकारी यांनी प्रस्तावाला मान्यता दिली असून गुन्हेगार शिवम उर्फ दाऊद उर्फ शुभम मनोज देशमुख (वय-२४) रा. पिंपळे रोड संविधान चौक, लाकडी वखारी मागे, अमळनेर याला नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश काढले. पोलीसांनी गुन्हेगाराला अटक करून जिल्हाधिकारी याच्या आदेशान्वये नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
एलसीबीचे पो.नि. किसन नजन पाटील आणि अमळनेर पोलीस ठाण्याचे पो.नि. विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि अनिल भुसारे, पो.ना. दिपक माळी, रविंद्र पाटील, किशोर पाटील, सिध्दार्थ शिसोदे तसचे अमळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार युनूस शेख, पोहेकॉ सुनिल दामोदरे यांनी कारवाई करत त्याला नाशिक कारागृहात पाठविण्यात आले.