नागपूर (क्राईम ट्युडे टीम ) : – हवेत उडणारा पंतग पकडण्याचा मोह विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतला आहे. पंतग पकडताना रेल्वेखाली आल्याने १३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना नागपूरातील धंतोली पोलीस स्टेशन हद्दीतील कुंभार टोली परिसरात घडली. वंश प्रवीण धुर्वे असं मयत विद्यार्थ्याचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वंश याचे वडील सुरक्षा रक्षक आहेत. वंश हा भिडे हायस्कूलमध्ये सातव्या वर्गात शिकायचा. शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास वंश हा परिसरातील मुलांसह कुंभार टोलीतील रेल्वे रुळाजवळ खेळत होता. यावेळी वंशला एक पतंग हवेत उडताना दिसला. तो पकडण्यासाठी वंश धावला. मात्र पतंग पकडण्याच्या नादात वंश थेट रेल्वे रुळावर जाऊन पोहोचला. याचवेळी त्याचा पाय रेल्वे रुळात अडकला आणि समोरून आलेल्या रेल्वेखाली तो चिरडला गेला. या दुर्घटनेत घटनास्थळीच वंशचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच धंतोली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तसेच पंचनामा करून पोलिसांनी वंशचा मृतदेह वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालयात रवाना केला. याप्रकरणी धंतोली पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करून करण्यात आली. रविवारी मकरसंक्रांतीचा सण साजरा होत आहे, आणि त्याच्या पूर्वसंध्येला दुर्देवी घटनेत वंशचा मृत्यूने धुर्वे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान उद्या मकरसंक्रातीनिमित्त सर्व मुले पंतग उडवितात. तुमचाही मुलगा पतंग उडवित असेल, सावधान त्याकडे लक्ष ठेवा , सुरक्षित काळजी घेत मकरसंक्राती सण साजरा करा, असे आवाहन क्राईम ट्युडे न्युजच्या वतीने आम्ही आपणास करत आहोत.
#nagpurnews#crimenews#sudentddaithundertrain#inseptflying