यात्रेत तरुणाने बंदूक काढली..अन् केला गोळीबार..नागरिकांची पळापळ

ठळक बातम्या राज्य

पुणे (क्राईम ट्युडे टीम)- दहशत पसरविण्याच्या हेतूने यात्रा सुरू असताना एका तरुणाने मद्यधुंद अवस्थेत बंदूक काढून हवेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील चांदखेड गावात समोर आला. या घटनेने यात्रेत एकच खळबळ उडून नागरिकांची पळापळ झाल्याचं पहायला मिळालं. घटनेची दखल घेत पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या तरुणासह चार जणांना ताब्यात घेतले आहे. अविनाश बाळासाहेब गोठे ( वय २२) , विजय अशोक खंडागळे ( वय १८) , अमर उत्तम शिंदे ( वय २२), अनिकेत अनिल पवार ( वय २६) असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मावळ तालुक्यातील चांदखेड येथे यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत मावळ तालुक्यासह इतर ठिकानाहून देखील नागरिक यात्रेचा आनंद घेण्यासाठी आले होते. या यात्रेत मोठ्या प्रमाणावर देखील गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले होते. या गर्दीचा फायदा घेत एका गुन्हेगाराने गावात दहशत निर्माण करण्यासाठी स्वताकडील पिस्तूल बाहेर काढले आणि हवेत गोळीबार केला. हेवत गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच गाड्यांच्या काचा फोडल्या.तसेच कोयत्याने फ्लेक्स फाडले, सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. घटना स्थळवरून आरोपी पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. काही काळ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. मात्र पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत. या प्रकरणी अधिक तपास शिरगाव पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *