जामनेर (क्राईम टूडे न्यूज रिपोर्टर) । जामनेर तालुक्यातील पाळधी येथील एका पेट्रोलपंप धारकाने शासनाची कोणतीही रॉयल्टी न भरता वाळू, डबर, मुरूम गौण खनिजाचा वापर करून बांधकामाला सुरूवात केल्याप्रकरणी महसूल पथकाने बुधवारी पेट्रोलपंप मालकाला चक्क ३ कोटी ७ लाख रूपये दंडाची नोटीस बजावल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. jamnercrime
जामनेर तालुक्यातील पाळधी गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रस्त्यावर नवीन पेट्रोल पंप उभारण्यात येत आहे. परंतू पेट्रोल पंप मालकाने शासनाची कोणतीही रॉयल्टी न भरता न भरता वाळू, डबर, मुरूम गौण खनिजाचा वापर करून बांधकामाला सुरूवात केल्याची माहिती जामनेर महसूल पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने पंचांना सोबत घेवून पंचनामा करण्यासाठी बुधवारी ११ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता रवाना झाले. पेट्रोलपंप मालकाकडे कोणत्याही प्रकारे शासनाची रॉयल्टी भरले नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार महसूल पथकाने जागेवर पंचनामा करून तब्बत ३ कोटी ७ लाख ४६ हजाराच्या दंडाची नोटीस बजावली आहे. jamnercrime याठिकाणी तलाठी यांनी घटनास्थळी जावून नोटीस दिली असून दोन दिवसात नोटीसीचा खुलासा देण्यात यावा असे निर्देश महसूल पथकाकडून देण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे ढाबे दणाणले आहेत.
#crimenews #crimetoday.news #crimeupdate #onlinecrime #jalgaoncrime #jamnercrime