बिबटयाच्या दोन बछड्यासह मादी जेरबंद…विमानतळावरील कर्मचाऱ्यांचा जीव पडला भांड्यात

जळगाव ठळक बातम्या राज्य

जळगाव ( प्रतिनिधी):- जळगाव विमानतळावरील धावपट्टीवर बिबट्याचा बछड्यासह मुक्तसंचार सुरु होता. या बिबट्या मादीसह तिच्या दोन बछड्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. विमानतळावर लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात आज बुधवारी बिबटमादी व तिचे दोन बछडे कैद झाले. त्यांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. दरम्यान या कारवाईने गेल्या काही दिवसांपासून भितीच्या वातावरणात असलेल्या विमान प्राधीकरणाच्या कर्मचाऱ्यांचा जीव भांडयात पडला आहे.

जळगाव विमानळतळावर बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले होते. हा बिबट्या वारंवार विमानतळाच्या धावपट्टीवर येत असल्याने त्याबाबत उपाययोजना करण्याच्या सुचना विमान प्राधीकरणाच्या वतीने वनविभागाला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार गल्या दहा दिवसांपासून बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी विमानतळ परिसरात वनविभगाने ट्रॅप कॅमेरे लावले होते. ५ जानेवारी रोजी कॅमेऱ्यात बिबट्या मादी व तिचे दोन बछडे आढळून आले होते. या तिघांना जेरबंद करण्यासाठी पिंजरे सुध्दा वनविभागाकडून लावण्यात आले होते. या पिंजऱ्यात बुधवारी बिबट्या मादी व तिचे दोन बछडे अडकले त्यांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांच्या मार्गदर्शनाखाली, मानद वन्यजीव रक्षक यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक वनसंरक्षक यु.एम.बिराजदार, वन परिक्षेत्र अधिकारी एन.ए.बोरकर, वनपाल संदीप पाटील, जी.एस.चौधरी, उल्हास पाटील, वनरक्षक दिपक पाटील, वनरक्षक चिंचोले, अजय रायसिंग, संभाजी पाटील, वाहन चालक भरत बाविस्कर, योगेश पाटील, यांचा कारवाईत सहभाग होता.

#Leopard #jalgaonnews  #jalgaonairport  #forestdeparment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *