अमळनेर (९ जानेवारी ) । अमळनेर तालुक्यातील नीम येथील विवाहितेने आपल्या मुलीसह विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना समोर आली होती. तिला आत्महत्या केल्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी रविवारी ८ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता मारवड पोलीस ठाण्यात एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, ४ ऑक्टोबर २०२२ रोजी तालुक्यातील कळमसरे शिवारात निम येथील विवाहितेने मुलीसह विहिरीत उडी ठाकून आत्महत्या केल्याची घटना ऑक्टोबर महिन्यात घडली होती. कळमसरे निम रस्त्यावर समबस्टेशन जवळ असलेल्या विहिरीत निम येथील समाधान जहांगीर कोळी याची पत्नी व मुलगी या मायलेकीचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत सुरूवातील मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
या प्रकरणी आता पती समाधान कोळी याने एकाविरुद्ध फिर्याद दिली आहे. यात गावातील अशोक गटलू कोळी यासम मृत विवाहितेने दिलेली ५ ग्रॅम वजनाची सोन्याची बाही त्याने परत केली नाही. तसेच संबंध ठेवण्याम नकार दिल्याने फोटो आणि व्हॉईस रेकॉर्डींग व्हायरल केल्याची धमकी दिल्यामुळे सदर विवाहितेने आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे. त्यावरुन अशोक गटलू कोळी याच्याविरुद्ध मारवड पोलीसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण शिंदे करीत आहेत.