जळगाव (८ जानेवारी) । मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या ताब्यावरुन सुरु असलेला वाद प्रकरणात दोघा गटाच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी व दगडफेक झाली होती. या गुन्ह्यातील संजय भास्कर पाटील (वय-४७) याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिक्षीतवाडी येथील राहत्या घरातून पोलिसांनी कायदेशीप्रक्रिया राबवून अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील मराठा विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या आवारात जमावबंदीचे आदेश लागू असतांना मराठा विद्याप्रसारक संस्थेचा ताबा घेण्यावरुन नरेंद्र पाटील व भोईटे गटात वाद होवून संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर दोन गटात हाणामारी झाल्याची घटना १९ जून २०१८ रोजी घडली होती. यावेळी हल्लेखोरांनी हातात लोखंडी रॉड, हॉकी स्टीक व लाठ्या काठ्यांचा वापर करुन तक्रारदारासह साक्षीदारांना मारहाण करीत गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रादार सुनिल धोंडू भोईटे यांच्या तक्रारीवरुन सुमारे २७ ते २८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन तपासधिकार्यांनी याप्रकरणाचा तपास पुर्ण करुन त्याचे चार्जशीट मार्च-२०२० मध्ये न्यायालयात दाखल केले आहेत. यातील काही संशयितांना यापुर्वी अटक झाली असून ते आता जामीनावर आहेत. तर पियूष नरेंद्र पाटील, बाळू चव्हाण रा. कानळदा, भूषण पाटील, चंद्रकांत जिजाबराव पाटील हे फरार होते. न्यायालयाच्या आदेशानुसार फरार दोन संशयितांच्या मागावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दोन दिवसांपासून होते. स्थानिक गुन्हे शाखेकडून संशयितांची माहिती गोळा केली जात होती.