धक्कादायक : महिलेला विवस्त्र करून मारहाण व विनयभंग

गुन्हे ठळक बातम्या धरणगाव

जळगाव (क्राईम टुडे न्यूज ) : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात एका गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या मुलाने गावातीलच एका मुलीला पळवून नेले आहे. त्यामुळे संतप्त मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या आईला भर रस्त्यावर असलेल्या एका गावात ५० वर्षीय महिलेला मारहाण करत विवस्त्र करून विनयभंग केल्याची घटना बुधवारी १९ जून रोजी सायंकाळी ७ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ११.३० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील एका  गावात ५० वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवारी १९ जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गावातील गाविहिरीतून पाणी भरून घरी जात असतांना गावात राहणाऱ्या काही महिला व ग्रामस्थांनी तिचा रस्ता आडविला. तिच्या मुलाने गावातील एका मुलीला पळवून नेल्याचा आरोप करत महिलेला अश्लिल शिवीगाळ करत लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर महिलेची अंगावरील साडी सोडून विवस्त्र करून विनयभंग केला. ही घटना घडल्यानंतर महिलेने रात्री ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार गावातील १४ जणांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ प्रदीप पवार हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *