जळगाव (क्राईम टुडे न्यूज) : घरासमोर लावलेली प्रवासी रिक्षा चोरुन ती बाहेरगावी विक्री करुन पसार झालेल्या जयेश परदेशी, प्रभात मानकेश्वर, ऋषीकेश बापु चित्ते (तिघे रा. कुसुंबा, ता. जळगाव) या तिघांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरलेली रिक्षा हस्तगत करण्यात आलीआहे.
जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील दीपक श्रीराम मोरे यांच्या घरासमोर लावलेली त्यांची (एमएच १९, सीडबल्यू २५९९) क्रमांकाची प्रवासी रिक्षा दि. ५ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले होते. दरम्यान, या पथकाकडून या गुन्ह्याचा तपास करीत असतांना ही रिक्षा गावातील जयेश परदेशी याने त्याच्या इतर दोन साथीदारांच्या मदतीने चोरुन तीची बाहेरगावी विक्री केल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाकडून संशयित जयेश परदेशी याच्यावर पाळत ठेवून होते. परदेशी हा दि. १६ जून रोजी रिक्षास घेवून गावात आल्याची माहिती मिळताच पथकाने त्याच्या घरातून त्याच्या मुसक्या आवळल्या. तसेच त्याच्याकडून चोरलेली रिक्षा हस्तगत करणयात आली आहे. परदेशी याला पोलिसांनी अटक केल्याचे समजताच त्याचे साथीदार हे बाहेरगावी पसार झाले होते. दरम्यान, दि. १९ जून रोजी पसार झालेल्या प्रभात मानकेश्वर, ऋषीकेश बापु चित्ते या दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांनी ही चोरी परदेशी याच्यासोबत केल्याची कबुली दिली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, किशोर पाटील, योगेश बारी, किरण पाटील, नाना तायडे, शशिकांत मराठे यांच्या पथकाने केली.