यावल (क्राईम टूडे न्यूज) – यावल तालुक्यातील साकळी या गावात एका छोटा हत्ती वाहनामध्ये कत्तलीच्या उद्देशातून गोवंश वाहतूक केली जात असतांनाचे प्रकार उघडकीस आले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यावल पोलिसांना गोवंश कत्तलीच्या उद्देशाने गोवंशची वाहतुक होत असल्याबाबतची माहीती पोलीसांना मिळाली होती. तेव्हा रविवारी पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन कारवाई करीत गोवंश आणि वाहतुक करणारे चारचाकी वाहन ताब्यात घेत दोन जणाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात प्राणी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साकळी तालुका यावल या गावात कत्तलीच्या उद्देशातून छोटा हत्ती वाहन क्रमांक (एमएच १९ एस ८०१५) मध्ये गोवंश वाहतूक केली जात होती.
याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळताच त्यांनी पथक त्या ठिकाणी पाठवले व पथकाने गोवंश आणि वाहन ताब्यात घेतले. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात हवलदार उमेश महाजन यांच्या फिर्यादीवरून नासिर शेख व जहांगीर खान दोन्ही रा.साकळी यांच्याविरुद्ध प्राणी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश सानप करीत आहे.