अमळनेर (Crime Today News) | धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा गावातील एका भागात राहणाऱ्या तरुणीसोबत लग्न ठरलेले असताना लग्नापूर्वीच तिच्यासोबत शारीरिक संबंध करत अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना २३ एप्रिल रात्री १० वाजेच्या सुमारास अमळनेर शहरातील एका भागात घडली आहे. त्यानंतर त्याने लग्न करण्यास नकार दिल्याने पीडित तरुणीने अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार बुधवारी १५ मे रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा गावातील एका भागात १९ वर्षे तरुणी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्या तरुणीचे अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका तरुणासोबत लग्न ठरलेले आहे. दरम्यान २३ एप्रिल रोजी रात्री १० वाजता तरुणाने लग्न ठरलेल्या तरुणीला अमळनेर येथे बोलून घेतले. नंतर धमकी देऊन तिच्यावर जबरी अत्याचार केला. नंतर ठरलेल्या लग्नाच्या दिवशी त्यांनी लग्न करण्यास नकार दिला. हा प्रकार घडल्यानंतर पीडित तरुणीने अमळनेर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अत्याचार करणाऱ्या तरुणासह त्याला मदत करणाऱ्या दोन जणांविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित सावळे हे करीत आहे.