आकार जीम येथे हृदयविकाराच्या झटक्याने एकाचा अकस्मात मृत्यू

गुन्हे जळगाव

जळगाव- (crime today ) ! जीममध्ये वर्क आऊट केल्याने अचानक हृयविकाराचा झटका आल्याने रोहीत जगदिश जाखेटे (वय ४२, रा. लेक साईड) यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना गुरुवार १६ मे रोजी सकाळी ७.३० वाजता रामदास कॉलनीतील आकार जीममध्ये घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील मेहरुण परिसरात असलेल्या लेक साईड येथे याठिकाणी आई, वडील, पत्नी, मुलगा व भावासह वास्तव्यास होते. ऑईलचा व्यवसाय करुन ते आपल्या कुटुंबाला हातभार लावित होते. नेहमीप्रमाणे १६ मे रोजी देखील  रोहीत जाखेटे हे रामदास कॉलनीत असलेल्या आकार फिटनेस याठिकाणी जीममध्ये वर्कआऊट करण्यासाठी गेले. वर्क आऊट केल्यानंतर सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ते पाणी पित असतांना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे जाखेटे हे त्याठिकणी जमिनिवर कोसळले. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्याठिकाणी सोबत असलेल्यांनी तात्काळ जाखेटे यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांची तपासणी केली असता, त्यांना सीएमओ डॉ. निरंजन देशमुख यांनी मयत घोषीत केले.

घटनेची माहिती मिळताच जाखेटे यांच्या कुटुंबियांसह त्यांच्या व्यापारी मित्रांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी जाखेटे यांना मयत घोषीत केल्याचम समजताच त्यांच्या कुटुंबियांनी मनहेलावणारा आक्रोश केेला. दरम्यान, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस अतुल पाटील व राहुल पाटील यांनी पंचनामा केला. त्यानंतर दुपारी जाखेटे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *