जळगाव- (क्राईम टुडे न्यूज) । किरकोळ कारणावरून एका कुटुंबातील पाच जणांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे ९ जानेवारी रोजी साडेआठ वाजता घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे अरूणा समाधान खुडे वय ४० या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ९ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून गावात राहणारे सागर रामकृष्ण काटोले, मनोज रामकृष्ण काटोले, रामकृष्ण काटोले आणि गणेश रघु फुलझाडे सर्व रा. शिरसोली ता. जि.जळगाव यांनी अरूणा खुडे या महिलेला आणि मुलगा करण खुडे, मयुर खुडे, मुलगी गायत्र खुडे आणि भाऊ शिवाजी नेटके यांना शिवीगाळ करत लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. तसचे मुलगी गायत्री खुडे यांच्या गळ्यातील सोन्याची पोत गहाळ झाली आहे. हा प्रकार घडल्यानंतर अखेर शनिवारी २० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणार सागर रामकृष्ण काटोले, मनोज रामकृष्ण काटोले, रामकृष्ण काटोले आणि गणेश रघु फुलझाडे सर्व रा. शिरसोली ता. जि.जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहे.