जळगाव-(क्राईम टुडे न्यूज) । जळगाव शहरातील एका भागातील परिसरात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील मयूरेश्वर कॉलनी परिसरातील एका भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी १९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शाळेत जाते असे सांगून घरातून बाहेर पडली. परंतु सायंकाळी उशिरापर्यंत देखील ती घरी न परतल्याने तिच्या कुटुंबियांनी तीचा नातेवाईकांसह मैत्रींकडे शोध घेतला. मात्र तरी देखील ती मिळून न आल्याने अखेर त्यांनी रात्री १०.३० वाजता जळगाव तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील हे करीत आहे.