वरणगाव (क्राईम टूडे न्यूज) । शहरात दिवाळी सणानिमित्त सर्वत्र जोरदार आतीषबाजी करण्यात आली. यामध्ये फटाके उडाल्याने आगीच्या घटना घडल्या. रविवारी रात्री उशीरा तिजोरी गल्लीसह इतर दोन ठिकाण असे एकुण तीठिकाणी फटाके उडाल्याने आग लागल्याने किरकोळ वस्तू जळल्याची घटना घडल्या आहे. याप्रकरणी पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, दिवाळी सणानिमित्त सर्वत्र जोरदार आतीषबाजी सुरू असतांना रविवारी १२ नोव्हेंबर रोजी रात्री १० ते १२ वाजेच्या दरम्यान जळगाव शहरातील तिजोरी गल्लीमध्ये एका दुकानावर असलेल्या पुठ्ठ्याला आग लागली. या ठिकाणी अग्नीशमन विभागाचा एक बंब पोहचला व आग विझविण्यात आली. यात किरकोळ नुकसान झाले. या सोबतच बस आगारात ठेवण्यात आलेल्या टायरला आग लागली. तेथे तीन बंब पोहचले. मात्र एका बंबाने पाण्याचा मारा करून आग विझविण्यात आली. तिसरी घटना रात्री पावणे बारा वाजता लेंडी नाल्याजवळ घडली. तेथे असलेल्या कचऱ्याला आग लागली. तसेच बाजूला असलेल्या अमृत योजनेच्या प्लास्टिक पाईपांनाही झळ बसली. या सर्व ठिकाणी मनपाच्या अग्नीशमन विभागाने पोहचून आग विझविली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.