जळगावात तरूणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; घातपातची शक्यता !

गुन्हे जळगाव

जळगाव (क्राईम टूडे न्यूज) – जळगाव आणि भादली दरम्यानच्या रेल्वे रूळाजवळ दिपक सुकलाल सोनवणे (वय-२४) रा. पवन नगर, जळगाव या तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मयत तरूणाच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आल्याने घातपात झाला असावा अशी चर्चा केली जात आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील पवन नगरात दिपक सोनवणे हा आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. रविवारी १२ नोव्हेंबर रोजी तो कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडला होता. दरम्यान भादली ते जळगाव अप रेल्वे रूळावरील खंबा जवळ सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दिपक सोनवणे यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला. यावेळी मयत दिपक सोनवणे याचे नातवाईक व मित्र परिवार यांनी एकच गर्दी केली होती.  मयत तरूणाच्या डोक्याला गंभीर जखमी जरी असली तरी अद्याप मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला हे मात्र समोर आलेले नाही. शनीपेठ पोलीस कर्मचारी याची चौकशी करीत आहे. शनीपेठ पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *