अमळनेर (क्राईम टूडे न्यूज) – नव्याने घराचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी षण दिलीप सोनवणे (वय-२) या बालकाचा संडासच्या टाकीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. एक महिन्यापुर्वीच वडीलांचे निधन झाले होते. त्यातच आता एकीकडे दिपावली साजरी होत असतांना दुसरीकडे चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.
अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री येथील अशोक सोनवणे यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असल्याने त्याठिकाणी शौचालयासाठी लागणारी टाकीचे बांधकाम करण्यात आले असून ही टाकी पुर्णपणे पाण्याने भरलेले होते. दरम्यान भूषण सोनवणे याचा शौचालयाच्या टाकीत पडून बुडून मृत्यू झाला होता. हा बाब त्याचे आजोबा लिलाधर गोविंदा सोनवणे यांना शौचालयाच्या टाकीत चिमुकला भूषण हा टाकीत मयतावस्थेत तरंगतांना दिसून आला. त्याला बाहेर काढून तातडीने अमळनेर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत अमळनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय पाटील करीत आहे. मयत मुलगा भूषण याचे वडील दिलीप लीलाधर सोनवणे यांचे १७ ऑक्टोबर रोजी दुर्धर आजाराने निधन झाले होते. त्यातच आता दिपावलीच्या दिवशी चिमुकलाचा दुदैवी मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.